Ajit Pawar : काही काही कार्यकर्ते चुकतात, पण आमची भावकीच चुकली, अजित पवारांनी निवडणुकीतला किस्साच सांगितला

Pune  : 'काही काही कार्यकर्ते चुकतात, पण आमची भावकीच चुकली.', असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार अशोक पवार यांचा पराभव झाला होता. त्यांना निवडणुकीमध्ये कसं पाडलं याचे स्पष्टीकरणच अजित पवार यांनी दिले. शिरूरमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी निवडणुकीतला हा किस्सा सांगितला.

शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे एका हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अशोक पवार यांना खोचक टोला लगावला. अजित पवार यांनी सांगितले की, 'कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. काही काही कार्यकर्ते चुका करतात आमची भावकी चुकली. नको नको म्हटलं तरी उभा राहिला. म्हटलं माऊलीकडून तुझा काटाच काढतो. त्याला स्वप्नही पडलं नसेल पाहून लाख मताने पडू. माऊलीने त्याला पाहून लाख मतांनी पाडला.'

तसंच, 'काही कार्यकर्ते कधी कधी चुका करतात, आमची भावकीच चुकली, अरे नको नको असे करू, चुकला तर म्हणालो माऊली कडून तुझा काटाच काढतो, त्यालाही स्वप्नातही वाटलं नसेल की पाऊन लाखांनी पडेल. तुम्ही सर्वांनी साथ दिली. तुमच्यामुळे आम्हाला हुरूप येतो.', असे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply