Ajit Pawar : अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, राष्ट्रवादीच्याच आमदाराचा सल्ला

Ajit Pawar : राज्याच्या राजकारणातून एक अतिशय मोठी बातमी आहे. अजित पवारांनी   वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत   जावं, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. अकोला येथे 'एबीपी माझा'शी साधलेल्या 'एक्सक्लुझिव्ह' संवादादरम्यान त्यांनी ही मागणी केलीय. दरम्यान, हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करत असल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय. 

Arif Shaikh Death : मोठी बातमी! अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजानचा मृत्यू, तुरुंगातच आला हार्ट अटॅक

अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राचं राजकारण बदलवतील : अमोल मिटकरी

अमोल मिटकरी म्हणाले,  अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं.हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करावा.  महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करत आहेत. यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवतील.   दोन्ही नेत्यांमध्ये दुवा होण्याची संधी मिळाल्यास स्वत:ला भाग्यवान समजेल.

कोणीही यावे काही बोलून जावे हे खपून घेतले  जाणार नाही : अमोल मिटकरी

अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवारांन महायुतीत एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे.  हे आता दिसून येत आहे.  कोणीही यावे काही बोलून जावे हे खपून घेतले  जाणार नाही.  महायुतीत अजित पवारांनी राहू नये असे यसाठी प्रयत्न देखील केले जात आहे. स्वत:हून अजित पवारांनी बाहेर पडावे यासाठी मानसिक त्रास दिला जात आहे. अशा पद्धधतीन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply