Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘या’ अधिकाऱ्याला दिली पुणे जिल्हाधिकारी पदाची ऑफर

Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुण्यात मोठी ताकद आहे. सन २०१४ ते २०१९ ही पाच वर्षे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत सहभागी होईपर्यंतचा काही काळ हा अपवाद वगळता गेली अनेक वर्षे अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस आयुक्त किंवा जिल्हाधिकारी या पदांवर चमकदार कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुत्रे देण्याकडे पवार यांचा कल असतो.

यापूर्वी सन २०१४ मध्ये नागपूर जिल्हाधिकारी म्हणून चांगले काम केल्यानंतर पवार यांनी सौरभ राव यांना पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून आणले. राव यांनी जलयुक्त शिवारमध्ये चांगले काम केले. दरड कोसळलेल्या माळीण गावचे पुनर्वसन, पालखी मार्गांचे विस्तारीकरण आणि मतदारयाद्यांची दुरुस्ती ही महत्त्वाची कामे त्यांनी प्रभावीपणे मार्गी लावली. तसेच अकोला येथील जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांना देखील पवार यांनीच पुण्यात सीईओ म्हणून आणले होते. त्यांनी देखील सीईओ म्हणून चांगले काम केले. आताही एक सनदी अधिकाऱ्याची प्रशासनात चांगलीच चर्चा आहे. या अधिकाऱ्याचे नाव आहे जितेंद्र डुडी.

Sharad Mohol Case : शरद मोहोळचा खून करण्यासाठी पैसे पुरविणारे अटकेत

उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांची राज्यस्तरावरील आढावा बैठक नुकतीच पुण्यात घेतली. या बैठकीत साताऱ्याचे जिल्हाधिकारी असलेल्या डुडी यांनी सादरीकरण केले. इतर अधिकाऱ्यांच्या तुलनेत हे सादरीकरण प्रभावी ठरले. त्यामुळे पवार यांनी डुडी यांची पाठ थोपटली आणि जाहीरपणे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी याल का? अशी विचारणा केली. पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आहेत. त्यांना पुण्यात येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. या बैठकीला पाच जिल्ह्यांचे वरिष्ठ तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. थेट उपमुख्यमंत्र्यांनीच कौतुक केल्याने प्रशासनात डुडी हे पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून येणार असल्याची चर्चा आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply