Ajanta Ellora Caves : अजिंठा-वेरूळला येणाऱ्यांनी परफ्यूम किंवा लाल कपडे न घालण्याचं आवाहन!अन्यथा होऊ शकतो मधमाशांचा हल्ला

Ajanta Ellora Caves : तुम्हाला पर्यटनाची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. पर्यटनस्थळी जाताना उग्र वासाचे परफ्यूम किंवा लाल रंगाचे कपडे घालून जात असाल तर थोडं सावध राहा. कारण पर्यटनस्थळाच्या आजूबाजूला मधमाशांचे मोहोळ असेल तर ते तुमच्यावर हल्ला करू शकते. जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर याच कारणामुळे मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात. परंतु या ठिकाणी जाताना काही काळजी घेणा आवश्यक आहे. येथे येताना उग्र वासाचे परफ्यूम वापरू नका आणि लाल रंगाचे कपडे घालू नका असे आवाहन करण्यात येत आहे. कारण यामुळे लेणींच्या परिसरातील मधमाशा तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता जास्त आहे.

मिथिलिन क्लोराइड, फेरॉन यांचा वापर केलेले उग्र गंधाचे परफ्यूम आणि लाल रंगामुळे मधमाशा चिडतात. त्यामुळे उग्र वासाचे परफ्यूम वापरून किंवा लाल रंगाचे कपडे घालून लेणीच्या किमान एक किलोमीटर परिसरात येणे टाळावे असे तज्ज्ञांचे मत आहे.

अजिंठा लेणीमध्ये दोन दिवसांपूर्वी २० पर्यटक आणि ६ कर्मचाऱ्यांवर मधमाशांनी केला हल्ला होता. यापूर्वी अजिंठा, वेरूळ आणि पितळखोरा या पर्यटनस्थळी आणि लेणीच्या ठिकाणी अशाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे अजिंठा आणि वेरूळ लेणीत पर्यटकांवर मधमाशांच्या वाढलेल्या हल्ल्यावर पुरातत्त्व विभागाने सर्वेक्षण केले. त्यानंतर आता पर्यटकांना अजिंठा आणि वेरूळ लेणीत उग्र परफ्यूमचा वापर करू नका आणि लाल रंगाचे कपडे घालू नका असं सांगण्यात आलं आहे.

उन्हाळ्यामध्ये जंगल सफारी, लेण्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात. वेरूळ आणि अजिंठा लेणीत मोठ्या प्रमाणात मोहोळ आहेत. तेथील मधमाशांचे परिसरात येणाऱ्यांवर हल्ले वाढले आहेत. मधमाशा लाल रंगामुळे देखील चिडतात आहे. 

तापमान ३४ अंश सेल्सियसपेक्षा अधिक वाढले तर मिथिलिन क्लोराइड आणि फेरॅान या रसायनांचा गंध अधिक उग्र होतो आणि माणसांप्रमाणे मधमाशांना देखील त्याचा त्रास होतो. यामुळे माशा गुदमरतात. त्याचबरोबर गुटखा, सिगारेटचा धूरसुद्धा मधमाशांना चालत नाहीत. त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटताना मधमाशांचे मोहोळ आपल्या किंवा आपल्या सोबतच्या पर्यटकांच्या अंगावर येऊ नये याची काळजी घ्या असे आवाहन तज्ञांनी केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply