Air India : शिंदे सरकारने एअर इंडियाची इमारत घेतली विकत; 'इतक्या' कोटींना झाली डील

Air India : महाराष्ट्र सरकार नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत खरेदी केली आहे. तिचे मंत्रालय विस्तारात रूपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे. या इमारतीची मालकी असलेल्या एआय अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या 1,600 कोटी रुपयांच्या ऑफरला सहमती दर्शवली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली होती आणि महाराष्ट्र सरकारला इमारत विकत घेण्यासाठी प्राधान्य देण्याची विनंती केली होती.

Satara Rain : साताऱ्यासह कराड, पाटणला पावसाने झोडपले; कर्नाटक, बीड, सोलापूर, विदर्भातून आलेल्या ऊसतोड मजुरांचे मोठे नुकसान

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी. राज्य सरकारला सांगितले होते की त्यांच्या मते या इमारतीची किंमत 2,000 कोटींहून अधिक आहे. राज्य अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारला एअर इंडियाकडून सुमारे 300 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची गरज आहे

 

मारतीची किंमत 2,000 कोटींहून अधिक आहे. राज्य अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारला एअर इंडियाकडून सुमारे 300 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची गरज आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात इमारतीसाठी बोलणी सुरू केल्यानंतर, एमव्हीए सरकारच्या अंतर्गत 2021 मध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली, परंतु कोणताही करार अंतिम झाला नाही.

1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातही ही इमारत दहशतवाद्यांचे लक्ष्य बनली होती. प्रचंड आर्थिक संकटातून जात असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एअर इंडियाने 2018 मध्ये ही 23 मजली इमारत विकण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती खरेदी करण्यात रस दाखवला होता.

मंत्रालयाचे काम एकाच छताखाली आणणे हा त्याचा उद्देश होता. खरेदी सुरू असतानाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात सत्तापरिवर्तन झाले आणि सौदा पुढे जाऊ शकला नाही.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply