Ahmednagar Politics : महसूलमंत्री विखेंना घरचा आहेर; भाजपच्या विवेक कोल्हेंच्या नेतृत्वात विखें विरोधात शिर्डीत मोर्चा

Ahmednagar Politics : शासकीय निधी वाटपात पालकमंत्री विखे पाटील दुजाभाव करत असल्याचा आरोप करत भाजपच्याच विवेक कोल्हेंनी आज शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. विखे पाटील यांच्याकडून सातत्याने होणारा अन्याय थांबला नाही तर शिर्डी मतदारसंघात त्यांच्या विरोधात दंड थोपटणार असल्याचा इशारा कोल्हे यांनी दिला आहे. त्यामुळे एकाच पक्षात असून अहमदनगर जिल्ह्यात विखे विरुद्ध कोल्हे हा राजकीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. 

राज्याचे महसूलमंत्री आणिआमच्यावर होत असलेल्या अन्यायाची आम्ही वरीष्ठांकडे अनेकदा तक्रार केली आहे. मात्र 'कुछ तो मजबूरी होगी' म्हणत वरीष्ठही दखल घेत नसल्याची खंत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील आणि भाजपचे कोल्हे यांचा राजकीय वाद आता विकोपाला गेलेला दिसत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोल्हेंची सत्ता असलेल्या कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना निधी देत नसल्याचा आरोप करत विवेक कोल्हेंनी केला आहे.

Supriya Sule : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; बारामती मतदार संघातून स्वत:ची उमेदवारी केली जाहीर

आज शुक्रवारी विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला होता. पालकमंत्री विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडून राजकीय दृष्टिकोन ठेवून निधी देण्यात दुजाभाव होत असल्याचा आरोप विवेक कोल्हे यांनी केला आहे. 

कोपरगाव आणि राहाता तालुक्यात असलेले अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची शेवटची संधी तुम्हाला देत आहे. जर तुमच्यात सुधारणा झाली नाही तर तर जनतेच्या हितासाठी विखे पाटलांच्या विरोधात राहाता मतदार संघात तळ ठोकणार असल्याचा इशारा विवेक कोल्हे यांनी दिला आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विखे पाटलांची सत्ता असलेल्या गणेशनगर कारखान्यासह अनेक ग्रामपंचायतवर कोल्हे गटाने सत्ता मिळवल्याने विखे पाटील जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट करत असल्याचा आरोप विवेक कोल्हे यांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply