Ahmednagar : ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं, धावत्या कारवर आयशर टेम्पो कोसळला; क्षणार्धात अख्खं कुटुंबच संपलं

Ahmednagar : पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारवर आयशर टेम्पो कोसळला. ओव्हर टेक करत असताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ घडली. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सुनील धारणकर (वय 48 वर्ष) , आशा सुनील धारणकर (वय 42) ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष) आणि अभय सुरेश विसाळ अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे.

Nagpur Latest News : 'घटनेची चौकशी तीन स्तरांवर होणार', नागपूर स्फोट दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मृत व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघाले होते. संगमनेर परिसरात त्यांची कार आली असता समोरून जात असलेल्या आयशर टेम्पोला कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याचक्षणी आयशर टेम्पो कारवर कोसळला. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी देखील वेळेवर घटनास्थळी धाव घेतल्याने एका महिलेचा जीव वाचला.

मात्र दुर्दैवाने अहमदनगर जिल्ह्यातीलच अकोले येथील ४ जणांचा जागीच मृत्यु झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका दोन वर्षीच्या चिमुकलीचा समावेश आहे. अपघातानंतर नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply