Ahmednagar News : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हळूहळू जाहीर होत आहे. अशातच संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर विखे पाटील गटाने सत्ता काबीज केली आहे. विखे पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा विजय झाला आहे. कर्जत - जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे. कुंभेफळ आणि खेडगावात भाजपचा सरपंच विराजमान झाला आहे. तर केवळ एका जागेवर करमणवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकाचा विजय झाला आहे. तर उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे.
अहमदनगरजिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतसाठी निवडणूक जाहीर झाली होती, त्यापैकी 16 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर 178 ग्रामपंचायतसाठी आज प्रत्यक्षात मतदान झालं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात 120 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली असून, 12 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 108 ग्रामपंचायतसाठी मतमोजणीला सुरवात झाली आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात 74 ग्रामपंचायतसाठी निवडणूक झाली असून, यातील 6 ग्रामपंचायतचा सरपंच पदाची बिनविरोध निवड झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शंकरराव गडाख यासह माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या तालुक्यातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
|
दरम्यान उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 06 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, खानापुर, पेंढेवाडी, कौठवाडी, आंबेगवण, देवगाव, कोकणवाडी आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर या सर्व ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे संगमनेर दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, यात बोरबन ग्रामपंचायत काँग्रेसकडे, तर ढोलेवाडी गुंजाळवाडी ग्रामपंचायत देखील काँग्रेसकडे गेली आहे. श्रीरामपुर तालुक्यातील 04 ग्रामपंचायती बिनविरोध असून, यात भैरवनाथ नगरकडे BRS कडे, गुजरवाडी काँग्रेसकडे, जाफराबाद, रामपुर स्थानिक आघाडीकडे, राहुरी तालुक्यातील 01 प्रिंप्री वळण ग्रामपंचायतवर देखील स्थानिक आघाडीचे वर्चस्व आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा, प्रिंप्री निर्मळ, वाकडी, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रूक या ग्रामपंचायतीमध्ये मविआ आणि भाजपमध्ये मोठी चुरस आहे.
जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतीपैकी 16 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यात, उत्तर नगर जिल्ह्यात 10 तर दक्षिण नगर जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायतचा समावेश आहे. म्हणजेच 194 पैकी 178 ग्रामपंचायतसाठी मतदान झालं असून, त्यात उत्तरेकडे 110 तर दक्षिणे 68 ग्रामपंचायतसाठी आज मतमोजणी होत आहे. दरम्यान कर्जत-जामखेडमध्ये भाजप आमदार शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी रोहित पवार गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर शेवगाव- पाथर्डी मध्ये भाजप आमदार मोनिका राजळे विरुद्ध चंद्रशेखर घुले गटाची प्रतिष्ठा पणाला लागावी आहे. तिकडे उत्तरेकडे मंत्री राधाकृष्ण विखे विरुद्ध माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इतर ठिकाणी स्थानिक आघाड्यांमध्ये लढत होणार आहे.
शहर
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
- Dadar News : मुंबईत 'उडता पंजाब'! दादरमधून ५ किलोचा ड्रग्ज जप्त, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
- Kalyan News : मुंबई लोकलमध्ये राडा, धक्का लागला म्हणून ३ जणांवर चाकूने हल्ला
महाराष्ट्र
- Chalisgaon Crime : नवरदेवाची आई जेवायला बसताच साधली संधी; साडेदहा लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स घेऊन चोरटा फरार
- Nagpur Crime : नागपूर हादरले; लग्न मंडपातच हत्या, दुसऱ्या घटनेत किरकोळ वादातून मित्राचा खून
- Navi Mumbai News : नेरूळच्या तलावात पाण्यावर तरंगताना आढळला महिलेचा मृतदेह; नवी मुंबईत खळबळ
- Sand Mafia : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले; ४० डंपर मालकांना १५० कोटींचा दंड, जिल्हाधिकारींकडून नोटीस
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर
- Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू