Ahmednagar : ऑनलाइन गेमच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा डाव? अहमदनगरमध्ये तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न

Ahmednagar : २२ वर्षीय तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिहार राज्यातील दोघांना संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडिया आणि पब्जी गेमच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी मुलीची आरोपींशी ओळख झाली होती. संगमनेरात येऊन आरोपींनी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात एका एका महाविद्यालयात शिकणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची पब्जी गेमच्या माध्यमातून बिहार राज्यातील अकरम शेख याच्याशी ओळख झाली होती. अक्रम शेख हा त्याचा मित्र नेमतुल्ला याच्यासह संगमनेर येथे संबंधित मुलीला भेटण्यासाठी आला.

तू माझ्यासोबत बिहारला चल आपण लग्न करू असे आमिष दाखवून त्याने मुलीला जबरदस्ती पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध करत पोलिसांना संपर्क केला असता पोलिसांनी तातडीने अकरम शेख आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. मात्र, हा लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.

दरम्यान, संगमनेर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून ऑनलाइन गेमच्या माध्यमातून मुलींना फसवून लव्ह जिहाद आणि धर्मांतर करणारे रॅकेट यामागे कार्यरत आहे का की आणखी काही हे पोलीस तपासातच निष्पन्न होईल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply