Ahmednagar News : बायोगॅसने ५ जणांचा मृत्यू; मांजर अद्याप विहिरीतच, विखे पाटलांकडून मृतांच्या कुटुंबीयांची भेट

Ahmednagar News : दोन दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील बायोगॅसच्या विहिरीत पडून ५ व्यक्तींचा मृत्यू झाला. मांजरीला वाचवताना ही दुर्घयटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार तसेच शेतावर कामाला असलेला गडी अशा पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे.

नेवासा तालुक्यातील वाकडी येथे बायोगॅसच्या विहिरीत पडलेल्यामांजराला वाचवताना सहा पैकी पाच जणांचा आपले प्राण गमवावे लागले. राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील वाकडी येथे घडलेल्या घटनेतील काळे आणि पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन आणि घटना स्थळाची पाहणी केली.

Lok Sabha Election : काँग्रेसला आणखी एक धक्का; रत्‍नागिरीतील बडा नेता भाजपच्या वाटेवर

झालेली घटना दुर्दैवी असून सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने काही अडचणी आहेत. मात्र तरीही निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन संबंधित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवू असे विखे पाटील म्हणालेत.

दरम्यान, ज्या मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नात पाच जणांचा मृत्यू झाला ते मांजर अद्यापही विहिरीतील कपारीत जिवंत अडकले आहे. बायोगॅसच्या विहिरीत मृत्यूचे तांडव घडल्याने या मांजराला वाचवण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीये.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply