Ahmednagar News : सद्गुरु निष्ठ संत निळोबाराय महाराज संजीवनी समाधी सोहळ्या निमित्ताने सजली पिंपळनेर नगरी

Ahmednagar News : जवळे पारनेर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील सद्गुरू निष्ठ संत निळोबाराय महाराज २७१व्या संजीवनी समाधी सोहळ्या निमित्ताने सजली पिंपळनेर नगरी६मार्च २०२४ते१३मार्च२०२४ या काळात महाराष्ट्रातील कीर्तनकार कीर्तन होणार असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे या काळात आयोजन करण्यात आले आहे

संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त पहिला टाळ ११ मार्च २०२४ रोजी सकाळी सहा ते सात संजीवनी समाधीची महापूजा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या वतीने होणार आहे तसेच सकाळी आठ ते दहा किर्तन
दुसरा टाळ १२ मार्च २०२४रोजी असून हैबत बाबा फडकरी श्री संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदी यांच्या वतीनेसकाळी सहा ते सात संजीवनी समाधी महापूजा व किर्तन१३ मार्च २०२४ शासकीय महापूजा सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी सिध्दीराम सालिमठ यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहेसकाळी आठ ते दहा हभप ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे किर्तनकाल्याचे किर्तन दुपारी बारा ते दोन हभप पांडुरंग महाराज घुले यांचे होणार आहे

Pune News : पुणे विमानतळापर्यंत मेट्रो नाहीच; प्रस्ताव अव्यवहार्य असल्याचा महामेट्रोचा दावा

तीन दिवस होणाऱ्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी निळोबाराय देवस्थान ट्रस्ट व पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जेणेकरून भाविकांना कोणतीही अडचण येणार नाहीतसेच सात दिवस होणाऱ्या सप्ताह मध्ये रात्री सात ते नऊ कीर्तन संपल्यानंतर येणाऱ्या भाविकांना वारकऱ्यांना भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती निळोबाराय देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अशोकराव सावंत व ट्रस्टच्या वतीने माहिती देण्यात आली आहेफोटो खालील ओळी निळोबाराय महाराजांच्या २७१ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त समाधी मंदिरावरती आकर्षक असे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे छायाचित्र शिरीष शेलार



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply