
अहमदनगर - प्रेम प्रकारणाबद्दल घरच्यांना माहिती दिली या रागातून सख्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी बहिणीला बेड्या ठोकल्या आहेत.
अहमदनगरमध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात ३० सप्टेंबर रोजी १६ वर्षीय हर्षदा बानकर या तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे भासत होते. मात्र हर्षदा हिची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे आणि ही हत्या तिच्याच सख्या मोठ्या बहिणीने केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे.
मयत हर्षदाची १९ वर्षीय मोठी बहीण सृष्टी बानकर हिचे श्रीरामपुर तालुक्यातील आकाश कांगुणे नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याबद्दल हर्षदा हिने घरच्यांना सांगितल्यानंतर घरच्यांनी सृष्टीला समज दिली होती तसेच काही दिवस कॉलेजला जाऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे सृष्टीच्या मनात हर्षदाबद्दल रागाची भावना निर्माण झाली होती.
त्यानंतर सृष्टी ही प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असल्याने हर्षदा हिने तीला तसे कृत्य करण्यास विरोध केला. प्रेमात आंधळी झालेल्या सृष्टीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हर्षदाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी सृष्टी हि प्रियकरासोबत ठरल्याप्रमाणे पळून गेली.
कोपरगाव पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करत आरोपी बहीण सृष्टी आणि तिचा प्रियकर आकाश कांगुणे यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून ताब्यात घेतले. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच मयताच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी सृष्टी बानकर हिच्यावर कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आंधळ्या प्रेमापोटी मोठ्या बहिणीने सख्ख्या लहान्या बहिणीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या हत्या प्रकरणात सृष्टीचा प्रियकर तसेच अन्य कोणी सहभागी आहेत का याबाबतचा अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी



























Subscribe to my channel


