Ahmednagar Constituency : अहमदनगरमध्येही जुना डाव, जुनी खेळी; निवडणुकीच्या रिंगणात निलेश लंकेंच्या नावाचा डमी उमेदवार

Ahmednagar Constituency : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला जास्तीत जास्त मते मिळावीत यासाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. यामध्ये विविध षडयंत्र आणि खेळी केल्या जात आहेत. शरद पवार अन् अनंत गीतेंच्या नावाचे डमी उमेदवार उभे राहिल्यानंतर आता निलेश लंकेंच्या नावाचा देखील एक डमी उमेदवार उभा राहिला आहे.

अहमदनगरमध्ये दोन निलेश लंके लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निलेश साहेबराव लंके असं या उमेदवाराचं नाव आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. अहमदनगरमध्ये महायुतीचे डॉ. सुजय विखे, महाविकास आघाडीचे नीलेश लंके, वंचित बहुजन आघाडीचे दिलीप खेडकर, एम आय एमचे परवेज शेख उभे आहेत.

Supreme Court : खटल्यांची माहिती मिळणार व्हॉट्सॲपवर ; सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटल पाऊल

निवडणुकीच्या या रिंगणात आता अपक्ष उमेदवार म्हणून नीलेश साहेबराव लंके यांनी देखील उडी घेतली आहे. नीलेश साहेबराव लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. महायुतीचे निलेश लंके आणि अपक्ष निलेश साहेबराव लंके यांच्यामुळे या मतदारसंघात आता दोन निलेश लंके या नावा अर्ज दाखल झाले आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडालीये. शेवटच्या दिवशी नगरमधून २७ उमेदवारांनी ३२ नामनिर्देशनपत्र दाखल केलेत. नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या ४३ वर पोहचली आहे. दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जाची छाननी आज होणार.

अनंत गीते आणि शरद पवारांच्या नावाचा डमी उमेदवार

रायगड लोकसभा मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते उभे आहेत. मात्र, अनंत गीते नावाच्या आणखी दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे मंत्री गीते यांना मत देऊ इच्छिणारे मतदार त्याच नावाप्रमाणे असलेल्या अपक्ष उमेदवारांना मतदान करतील अशी दाट शक्यता आहे. बारामतीमध्ये देखील लोकसभा मतदारसंघात शरद पवार नावाच्या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply