Ahmednagar Accident News: लग्नाला निघालेला पिकअप विहिरीत कोसळला; कोपरगावमधील घटना

Ahmednagar Accident News : लग्नासाठी निघालेले पिकअप वाहन महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे शिवारात हा अपघात झाला आहे. एका विवाह समारंभासाठी निघालेले काहीजण या वाहनात होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

कोपरगाव येथून ही गाडी मुंबई-नागपूर महामार्गाने खुलदाबादकडे जात असताना ही घटना घडली आहे. मात्र नियंत्रण सुटल्याने ही गाडी थेट विहिरीत जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेत सहा जणांना विहिरी बाहेर काढून आणि त्यांना रुग्णालयात पाठवले.

काही वेळात कोपरगाव पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रेनच्या सहाय्याने पिकअप वाहन विहिरीतून बाहेर काढण्यातही यश आलं आलं आहे. विहीरीत आणखी कुणी अडकलंय का? याची तपासणी देखील केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply