Ahmedabad Airplane Crash : 'बाबा, काळजी करू नका...', रिक्षा चालवून वडिलांनी मुलीला शिकवलं; नोकरीसाठी लंडनला पोहण्याआधीच मुलीचा करुण अंत

Ahmedabad Airplane Crash : गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे भीषण विमान अपघात घडला. एअर इंडियाचे विमान टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच कोसळले. या भीषण दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला असून, काही वैद्यकीय विद्यार्थ्यांचाही यात समावेश होता. कुणी शोकसभेला, तर कुणी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रवास करत होते. परंतु, एका रिक्षाचालकाच्या मुलीवर लंडनमध्ये नोकरीच्या निमित्ताने रवाना होण्यापूर्वीच काळाने झडप घातली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

पायल खटिक असे मृत तरूणीचे नाव आहे. मूळची राजस्थानची असलेली पायल गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासोबत गुजरातमधील हिम्मतनगर येथे राहत होती. पायलचे वडील सुरेशभाई खटिक हिम्मतनगरमध्ये रिक्षा चालवतात. मोठ्या कष्टातून त्यांनी आपल्या मुलीला शिकवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला लवकरच चांगली नौकरी मिळाली.

Jalna News : अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून ३५ कोटी हडपले, जालन्यातील १० तलाठ्यांचे निलंबन

एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या पायलला कंपनीच्या कामासाठी लंडनला पाठवण्यात येत होते. विशेष म्हणजे, हा तिचा पहिलाच विमान प्रवास होता. ती दूर जाणार म्हणून तिला विमानतळावर सोडायला येताना वडिलांना अश्रु अनावर झाले. त्यांना कल्पना नव्हती आपली मुलगी कायमची इतकी दूर जाईल. अपघाताची बातमी मिळताच खटिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply