पुणे : वीज खरेदीसाठी महाप्रीतबरोबर करार; स्वतंत्र हेतू कंपनी स्थापन करण्यास मान्यता

पुणे : खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यासाठी महापालिकेने महाप्रीत या शासकीय संस्थेबरोबर करार केला आहे. त्याअंतर्गत महाप्रीतबरोबर स्वतंत्र हेतू कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल- एसपीव्ही) स्थापन करण्यात येणार असून समिती स्थापन करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

महापालिकने चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात वीज खर्चापोटी २९३ कोटींची तरतूद केली आहे. वीज खर्चात बचत करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून महापालिकेला वीज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र अन्य वीज कंपनीकडून खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने जास्त वीज वापर असलेल्या विभागांची यादी तयार केली आहे. त्यापोटी महापालिकेला वार्षिक खर्च मोठ्या प्रमाणवर करावा लागत आहे. त्यामुळे महाप्रीत संस्थेबरोबर महापालिकेने करार केला आहे. त्याअंतर्गत स्वतंत्र हेतू कंपनी स्थापन करण्यात येणार आहे.

महापौर, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता, वीज संवर्धन क्षेत्रातील तज्ञ आणि महाप्रीत संस्थेचे प्रतिनिधी असे या कंपनीचे सदस्य असतील. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply