AFG vs NZ : T20 वर्ल्डकपमध्ये आणखी एक उलटफेर! अफगाणिस्तानचा बलाढ्य न्यूझीलंडला 'दे धक्का'; ८४ धावांनी उडवला धुव्वा

AFG vs NZ : टी ट्वेंटी विश्वचषकाच्या मैदानात अफगाणिस्तानच्या संघाने बलाढ्य न्यूझीलंड संघाचा ८४ धावांनी पराभव करत नवा पराक्रम केला. आधी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दिलेले निर्णायक धावांचे आव्हान अन् नंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याने न्यूझीलंडचा धुव्वा उडाला. कर्णझार राशिद खान आणि फजलहक फारूकी या विजयाचे शिल्पकार ठरले.

सामन्याच्या सुरूवातीला न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने 20 षटकांत 6 गडी गमावून 159 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने खेळी खेळली, त्याने 56 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. याच धावांच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडसमोर १६० धावांचे लक्ष ठेवले होते.

USA Vs PAK : युएसएने इतिहास रचला! मुंबईकर नेत्रावळकरची सुपर ओव्हरमध्ये सुपर बॉलिंग, पाकिस्तानचा पराभव

परंतु 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर संघाला पहिला धक्का बसला, जेव्हा फझलहक फारुकीने फिन ऍलनला बोल्ड करून गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर किवी संघाने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवेच्या रूपाने दुसरी विकेट गमावली.

अशाप्रकारे फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे न्यूझीलंडचा संघ 75 धावांवर ऑलआऊट झाला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांची अवस्था इतकी वाईट झाली की त्यांना पूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत. अवघ्या 15.2 षटकांत न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आला. या विजयासोबतच अफगाणिस्तानने न्यूझीलंडला टी ट्वेंटीमध्ये पहिल्यांदा धुळ चारण्याचा पराक्रम केला. तसेच टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply