Aditya Thackeray : तर माझ्या आजोबांना आनंद झाला असता"; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackeray : मुंबईतल्या डीलाईल रोड पुलाचं उद्घाटनं शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केल्यानं त्यांच्यावर महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना आपले आजोबा अर्थात बाळासाहेब ठाकरे यांना याचा आनंद झाला असता असं म्हटलं आहे. पण त्याचबरोबर त्यांनी सरकारला काही सवालही विचारले आहेत.

10 दिवस झाले तरी वेळ नाही

आदित्य ठाकरे म्हणाले, "काल रात्री आणि सकाळी माझ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे का दाखल केलेत तर डीलाईल रोड सुरू केला म्हणून. डीलाईल रोड पूर्ण होऊन 10 दिवस झाले तरी देखील घटनाबाह्य सरकारला उद्घाटन करायला वेळ नाही. तिथे बॅरिकेड्स होते ते आम्ही बाजूला केले आणि पुढे गेलो आणि रस्ता खुला झाला असंही त्यांनी सांगितलं"

Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून काढून टाका म्हणणाऱ्या संभाजीराजेंना भुजबळांचं प्रत्युत्तर; म्हणाले, तुम्ही एका समाजाचे...

तर बाळासाहेब ठाकरेंना आनंद झाला असता

लोकांना अनेक वर्षे त्रास होत आहे. पण यांना उद्घाटन करण्यासाठी वेळ नाही म्हणून रस्ता बंद करण्यात आला. मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी लढत असताना गुन्हे दाखल झाले तर माझ्या आजोबांना बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता, असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट का केलं नाही?

पुलाच्या कामाला एवढा उशीर का झाला? कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट का केलं नाही? असा सवालही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरलो तर आमच्यावर गुन्हा दाखल करता. 'कॉन्ट्रॅक्टरमेव जयते' म्हणणारं हे सरकार आहे, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

नवी मुंबई मेट्रोचं काम 5 महिने थांबवलं!

नवी मुंबई मेट्रो 5 महिने थांबवलं कारण उद्घाटनासाठी वेळ नाही. मी राज्यपालांना पत्र लिहून विनंती केली आहे की सरकारला सांगा जे काम आहे त्यावर लक्ष द्या म्हणून. काही दिवसांचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी कामावर लक्ष द्यावं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लबोल केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply