Accident News : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कार उलटली, चौघे जण गंभीर जखमी

Accident News :   छत्रपती संभाजीनगरहून भरधाव वेगात बीडकडे जाणाऱ्या कारचालकाचे कारच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन चौघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील लेंभेवाडी शिवारात सोमवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पडली

वासंबंधी अधिक अशी, केज, (ता. जि. बीड) येथील हसनेन शेख (वय १४), कैफ इनामदार (वय २०), अमीरोद्दीन इनामदार (वय ५५), रफत सुलताना इनामदार (वय ४८) हे आपल्या नातेवाईकांना छत्रपती संभाजीनगर च्या विमानतळावर सोडण्यासाठी (क्र. एम एच.२३.ए. एस.९८३७) ने छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते.

Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सुधारित पेन्शन योजना १ मार्चपासून लागू होणार

ते नातेवाईकांना विमानतळावरती सोडून आपल्या गावी सदर कारने येत असतांना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरावरील लेभेवाडी शिवारात या कार चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटून कारने चार पाच कोलाच्या आधा घेऊन ही कार थेट महामार्गाच्या कडेला असलेल्या नालीत जाऊन उलटली.

हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्णत चूराडा झाला तर कारमधील हसनेन शेख (वय १४), कैफ इनामदार (वय २०), अमीरोद्दीन इनामदार (वय ५५), रफत सुलताना इनामदार (वय ४८) हे गंभीर जखमी झाले मात्र सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही.

हा अपघात झाल्याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांसह पाचोड भोकरवाडी नटोलनाक्यावरील रूग्णवाहीकेला दिली. ही माहिती मिळताच तेथील कर्मचारी महेश जाधव, विठ्ठल गायकवाड, गणेश येडे आदिनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमीना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश साबळे यांनी सर्व जखमींवर प्रथोमोपचार करून त्याना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठवले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply