Accident News : ट्रक- ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दोन जागीच ठार, जेसीबीच्या सहाय्याने काढले मृतदेह

यवतमाळ : भरधाव ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत ट्रक व ट्रॅव्हल्स चालकांचा जागीच मृत्‍यू झाला. महागांव तालुक्यातील मुडाणा येथे घटना घडली. अपघात इतका भीषण होता की मृतदेह जेसीबीच्‍या सहाय्याने काढावे लागले.

नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुडाणा येथील शिवतेज धाब्यासमोर महागावकडुन नांदेडकडे दगडी कोळसा घेवुन जाणार ट्रक आणि नांदेडकडून नागपुरकडे जाणारी विना नंबरची ट्रॅव्हल्स यांची समोरासमोर धडक झाली. ही दोन्ही वाहने भरधाव वेगाने असल्याने व अचानक समोरासमोर आल्याने एकमेकांना धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचा समोरचा भाग अक्षरशः चुराडा झाला आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *