Accident News : अहमदनगरच्या शेतमजुराच्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह दोन भावंडांनी जागीच गमावला जीव

Accident News : अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी कंटेनर आणि दुचाकींच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली. अहमदनगरच्या कुटुंबावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात आई-वडिलांसह दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी चारच्या अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल  येथे कंटेनरने धडक दिल्याने  हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मयतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. या घटनेने पारनेरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनिल बाळासाहेब पवार (वय 20), सोनाली अनिल पवार (वय22), माउली अनिल पवार आणि एक सहा महिन्यांची मुलगी (सर्व रा. वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) अशी दुचाकीवरील मृतांची नावे आहेत.

Nandurbar News : महिलांची हंडाभर पाण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट; नर्मदा काठावरील तिनसमाळ गावातील वास्तव

अपघातानंतर कंटेनर चालक फरार

 इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक (एचआर 38, एसी 5848) ने पुढे चाललेल्या मोपेड दुचाकी क्रमांक (एमएच 16, सीबी 5202 ) तसेच दुसरी दुचाकी क्रमांक (एमएच 16, एव्ही 1931 यांना पाठीमागून जोराची धडक दिली. ही घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली. त्यामध्ये मोपेड दुचाकीवरील चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड (रा. पांगरमल, ता. नगर) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला.

शेतकरी मजुराच्या कुटुंबावर काळाचा घाला

समोर आलेल्या माहितीनुसार, कांदा काढणीसाठी कापूरवाडीला वास्तव्य होते. वडगाव सावताळचे पवार कुटुंब हे कापूरवाडी (ता. नगर) येथे कांदा काढणीच्या कामासाठी एक ते दीड महिन्यापासून नगर तालुक्यात होते. मयत अनिल पवार यांची सासूरवाडी घोडेगाव (ता. नेवासा) येथील आहे. तयांच्या मागे आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. एकाच वेळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे वडगाव सावताळ गावावर शोककळा पसरली आहे.

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply