Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मॉरिसवर गुन्हा दाखल; 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.फेसबुक लाईव्ह सुरु असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली आणि त्यानंतर त्यानेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. रोहित शाहू आणि मेहुल पारेख या दोघांना पोलिसांना ताब्यात घेतलं. रोहित शाहू याला चौकशी करुन पोलिसांना सोडलं आहे. तर मेहुल पारेखची पोलीस अद्यापही चौकशी करत आहेत. 

Pune Crime News : आळंदीत महावितरणच्या डीपीचा स्फोट, घरानेही घेतला पेट; एकाचा होरपळून मृत्यू, सात जखमी

मॉरिस नोरोन्हावर गुन्हा दाखल

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी मृत आरोपी मॉरिस विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या MHB पोलिसांनी आयपीसीच्या कलम 302, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3 आणि 25 आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 37 (1) (ए), आणि 135 नुसार गुन्हा दाखल केला.

अभिषेक घोसाळकर यांना चार गोळ्या लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उजव्या मांडीला दोन गोळ्या, पोटात एक आणि छातीच्या डाव्या बाजूला एक गोळी लागल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply