Aadivasi Protest Nagpur : आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या आंदोलनाचा आज १२ दिवस; प्रलंबित मागण्यांसाठी जनसमुदाय रस्त्यावर

Aadivasi Protest Nagpur : नागपूरात आदिवासी गोंड गोवारी आंदोलकांचं आमरण उपोषणाचा  आज १२ वा दिवस आहे. १० तारखेला सरकार सोबत बैठक बोलावली आहे. तोडगा न निघाल्यास संपूर्ण विदर्भभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

सरकारने उपोषणाची दखल घेतली नाही, त्यामुळे हजारो गोंड गोवारी बांधवांनी नागपूरात रस्ता रोको केला होता. गोंड गोवारी जमातीला एसटीचे लाभ मिळावे, अनुसूचित जातीच्या हक्क प्रदान करण्यात यावे, यासह विविध मागणींसाठी आदिवासी बांधव आंदोलन  करत आहेत. या मागणीसाठी किशोर चौधरी, सचिन चचाने आणि चंदन कोहरे यांचं संविधान चौकात उपोषण सुरूच आहे. 

Pune Highway Traffic Update : कामशेत खिंडीत 6 अवजड वाहनं बंद पडली, पुण्याकडील वाहतूक खाेळंबली

समाजाच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष

26 जानेवारीपासून आदिवासी गोंड गोवारी समाजाच्याआंदोलकांनी नागपुरात आमरण उपोषण सुरु केलंय. मात्र, या उपोषणाकडे शासनाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. उपोषण करणाऱ्या आंदोलकांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. शासनाच्या या कृती विरोधात आदिवासी गोंड गोवारी समाजामध्ये असंतोष निर्माण झालाय.

याविरोधात नागपूरातील  संविधान चौकात समाज बांधवांनी आपले अधिकार आणि हक्कांसाठी 5 फेब्रुवारी रोजी भव्य मोर्चा काढला होता. शासन मागण्या गंभीरपणे घेत नाहीये, फक्त आश्वासन देऊन समाजाची दिशाभूत केली जातेय. त्यामुळं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जोपर्यंत आता उपोषण मंडपात भेट देत नाही, तोपर्यंत हे उपोषण असंच सुरू राहील, असा इशारा देखील या मोर्चातून देण्यात आलाय.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

महाराष्ट्रातील गोंड गोवारी जमातीला निर्गमित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रानुसार अनुसूचित जमातीचे सर्व लाभ देण्यात यावेत. तसंच वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं. विद्यार्थ्यांच्या बेकायदेशीरपणे रोखून ठेवण्यात आलेल्या स्कॉलरशिप विनाविलंब देण्यात याव्यात. पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या रोखून ठेवलेले पदवी प्रमाणपत्रं तात्काळ निर्गमीत करावे.

संविधानिक आणि वैधानिक तरतुदीनुसार गोंड गोवारी जमातीची संस्कृती व रूढी परंपरा पालन करण्याऱ्या सर्व अर्जदारांना गोंड गोवारी जमातीचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंबधीचे आदेश देण्यात यावे. अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply