
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीवर अंतिम शिक्कामोर्तब केला आहे. म्हणजेच आता वाढीव डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात जोडला जाणार आहे. वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने जानेवारी ते जून 2023 पर्यंत डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. डीए हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा भाग आहे.
सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते
सरकार दर 6 महिन्यांनी कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते. महागाईचा दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते. महागाई जितकी जास्त तितकीच डीएमध्ये वाढ केली जाते. कामगार ब्युरो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची गणना करते. त्याची गणना ग्राहक किंमत निर्देशांकच्या (CPI-IW) आधारे केली जाते.
तत्पूर्वी सरकारने मागील सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. ज्यामुळे डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांपर्यंत वाढला होता. सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै 2021 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये आणखी 3 टक्के वाढ देऊन महागाई भत्ता 31 टक्के करण्यात आला होता.
पगार किती वाढणार?
डीएमध्ये चार टक्के वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती टक्के वाढ होणार, हे समजून घेऊ. समजा केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे. जर आपण 38 टक्के पाहिले तर डीए 6,840 रुपये होतो. तसेच 42 टक्के पाहिल्यास ही रक्कम 7,560 रुपये होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात 720 रुपयांची वाढ होणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

