Bhandardara Dam : भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हरफ्लो; पाण्याचा विसर्ग वाढविल्याने प्रवराला मोठा पूर

Akole (Ahilyanagar) : अहिल्यानगर जिल्ह्यातील ११ टीएमसी क्षमता असलेले भंडारदरा धरण अखेर काठोकाठ भरले आहे. धरणातून ३५५२ क्युसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे. तसेच भंडारदरा पाठोपाठ ८ टीएमसी क्षमता असलेले निळवंडे धरण देखील ओव्हरफ्लो झाले असून धरणातून १५०० क्युसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे.

मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आल्याचे चित्र होते. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर आवश्यकता भासल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील मांजरा धरण फुल्ल बीड : बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील छोटी मोठी धरण ओव्हरफ्लो झाले असून जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण मानलेले मांजरा धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले असून बीड, धाराशिव आणि लातूरची तहान भागवणारे मांजरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती पाण्याची चिंता मिटली असून याच धरणाच्या पाण्याची जलपूजा आज खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.

गिरणा धरण ७७ टक्के भरले

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालूक्यात असणारे सर्वात मोठे गिरणा धरण सध्या ७७ टक्के भरले असून लवकरच धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. कळवणच्या चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर गिरणा नदी पत्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरण भरल्यास त्याचा फायदा मालेगाव, जळगावसह गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या पाणी पुरठा येजनांना होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *