
Teacher ID Scam : बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सायबर पोलिसांकडून आतापर्यंत तपासलेल्या १ हजार ८० आयडीमधून ६८० शिक्षकांचे आयडी बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ६८० बोगस शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे. या सर्वांना पोलिसांकडून अटक करण्यात येणार असल्याचे संकेत एसआयटीकडून मिळाले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.
नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. ५ महिन्यांपूर्वी हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहेत. उपसंचालक उल्हास नरड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने विभागातील २३३ शिक्षकांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचा अहवाल सादर केला होता. त्या आधारेच सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. १२ मार्चला सायबर पोलिसांकडे या प्रकरणात पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना एक एकाची नावं समोर येऊ लागली.
सायबर पोलिसांनी केलेल्या तपासातून नागपूर विभागातील एकूण शिक्षकांपैकी १ हजार ८० शिक्षकांचे आयडी बोगस असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडून या सर्व शिक्षकांची चौकशी सुरू करण्यात आली. शालार्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश वाघमारेला पोलिसांनी अटक केली. पण या प्रकरणातील आरोपी माजी उपसंचालक सतीश मेंढे अद्यापही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.सतीश मेंढेला अटक करण्याबाबत पोलिसांकडून कुठलेही प्रयत्न होत नसल्याचे दिसून येते. तिन्ही न्यायालयांनी सतीश मेंढेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. असे असताना देखील त्याला अटक होत नसल्यामुळे अटकेबाबत शाशंकता व्यक्त होत आहे. या प्ररणाच्या तपासातून ६३३ शिक्षकांची नियुक्ती बोगस असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास करत असताना गेल्या पाच महिन्यांत पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी, शिक्षणाधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकांना अटक केली. पण अद्यापही शिक्षकांवरील संकट संपलेले नाही. आर्थिक व्यवहार करत बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने शिक्षक म्हणून नियुक्त दर्शवत अधिकाऱ्यांच्या मदतीने ६८० शिक्षकांनी शालार्थ आयडी मिळवल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या सर्वच शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

