Pune Crime : ८ जणांनी कोयता अन् तलवारीने सपासप वार केले, तरूणाचे हात-पाय तोडले, मध्यरा‍त्री कोथरूडमध्ये थरार

Pune Kothrud crime News : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा प्रकार ताजा असतानाच कोथरूडमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोथरूडमध्ये मध्यरात्री ८ ते १० जणांच्या टाळक्यांनी एका तरूणाचा खून केला आहे. गेल्या आठवड्यातच कोथरूडमध्ये भर दिवसा थरार घडला होता. आता मध्यरात्री तरूणाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

पुण्यात टोळक्याकडून मध्यरात्री तलवारीने वार करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तलवार, सत्तुर आणि कोयत्याने सपासप वार करत जीव घेतला. पूर्व वैमनस्यातून ८ ते १० जणांच्या टोळक्याने तरुणावर हल्ला केला, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. गौरव अविनाश थोरात (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Khadakpurna River : खडकपूर्णा नदीत नैसर्गिक किमया; पाण्याच्या प्रवाहामुळे हजारो रांजणखळगे निर्मिती

हल्ल्याप्रकरणी सागर कसबे यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. कोथरुड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतले आहे. यावरून पोलिसांनी दिनेश भालेराव, सोहेल सय्यद, राकेश सावंत, साहिल वाकडे, बंड्या नागटिळक, लखन शिरोळे, अनिकेत उमाप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव आणि संबंधित आरोपी यांच्यामध्ये याआधी कुठल्यातरी कारणावरून भांडणे झाली होती. रात्री १२.३० वजा गौरव हा शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले आणि त्यांच्यातील एकाने गौरव याच्यावर गोळी झाडली, मात्र ती त्याला लागली नाही. दरम्यान, टोळक्याने तलवार, सत्तुर, कोयत्याने गौरव याच्या मान, डोके, पोटावर व पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरुन गावठी पिस्टल, तलवार, सत्तुर जप्त केले असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply