Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासहित एकनाथ शिंदेही शपथ घेणार; सोहळ्यात लाडक्या बहिणींसाठी खास आसनव्यवस्था

Mumbai : महायुती सरकारचा मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ घेणार आहेत. यंदाही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला असणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला जाणार आहे. या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मजल मारली. या निवडणुकीत महायुतीने २३० जागा जिंकल्या. महायुतीमधील भाजपने १३२ जागा जिंकल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागा जिंकल्या आहेत. तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. या निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीने महाविकास आघाडीला ४६ जागांवर रोखलं. महाविकास आघाडीला ५० आकडाही गाठता आला नाही. विधानसभेच्या निकालानंतर ११ दिवसांनी खातेवाटपाचा पेच सुटला या शपथविधीला राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री सुद्धा शपथ असल्याचं निश्चित झालं आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्र्यांसोबत इतर राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

Maharashtra Politics: गृहखात्यावर शिंदे गट ठाम, शपथविधी सोहळ्यापूर्वी गुलाबराव पाटील यांचं मोठं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला असणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्वाचं विशेष लक्ष असणार आहे. या सोहळ्याला इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांची देखील हजेरी असणार आहे. त्यामुळे या शपथविधीकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात भगवा रंग आकर्षणाचा मुद्दा ठरला आहे. शपथविधी सोहळ्याला बांधण्यात आलेल्या तीनही पंडालचे कापड भगवे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हिंदुत्व आणि भगवा रंग याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या शपथविधी सोहळ्याला वेगवेगळ्या मान्यवरांची हजेरी पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याला राज्यातील विविध भागातील लाडक्या बहिणी देखील हजेरी लावणार आहेत. सर्व महिला या भगव्या रंगाच्या साड्या परिधान करुन शपथविधी सोहळ्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply