Sindkhed Raja: राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोर उत्खननात सापडली शेषशायी विष्णूची सुबक मूर्ती !

Lord Vishnu : मातृतिर्थ सिंदखेड राजा शहरांमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू असलेल्या या शहरात अनेक मूर्ती आढळून येत आहेत. राजे लखुजीराव जाधव यांची सर्वात मोठी दगडी बांधकाम असलेली समाधी येथे सोळाशे च्या शतकात बांधली गेली याच समाधी परिसरात सध्या केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण कडून उत्खनन सुरू आहे.

समाधी परिसराची दुरुस्ती व्हावी या दृष्टीने हे काम हाती मॅण्यात आले होते मात्र, याच उत्खननात मागील महिन्यात शिवलिंग आढलून आले त्यानंतर येथे सुरू असलेले उत्खनन अधिक गाभीयनि केले जात आहे. या काम शिवलिंग मिळालेला परिसर खोदण्यात आल्या नंतर संपूर्ण शिवमदिराचा धाचा येथे आढळला आहे.

Free Ration : "ज्यांनी मतदान केले नाही त्यांना रेशन देऊ नये," मुंबईतील भाजप नेत्याची मोदींकडे मागणी

शिवमंदिर पाय पर्यंत खोदण्यात आल्या नंतर चार दिवसापूर्वी येथे अत्यंत रेखीव कलाकुसर असलेली शेषनाग भगवंताची विश्राम अवस्थेतील मूर्ती, पायाजवळ सेवारत लक्ष्मी अशी ही मूर्ती आढळून आली आहे ही मूर्ती आढळून आल्या नंतर केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षणचे नागपूर येथील वरिष्ठ अधिकारी अरुण मलिक यांनी आपल्या टीम सह येथे भेट देवून स्वतः मूर्ती काढण्यासाठी काम केले.

सोबत असलेल्या तज्ञांना मूर्ती काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या. सद्या ही मूर्ती पाया पासून पोटा पर्यंत मातीच्या बाहेर दिसत आहे. अत्यंत काळजीने ही मूर्ती काढली जात असून पुढील चार ते पाच दिवसात मूर्ती मातीतून पूर्णपणे मोकळी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे अधिक्षक भारतीय पुरात्त्वविद अरुण मलिक, सहायक शिल्पा दामगडे, शाम बोरकर, शाहीद अख्तर, दीपक सुरा यांच्यासह कामगार स्थानिक कर्मचारी उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply