Ind Vs Pak Playing-11 : कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय; पाकिस्तानविरुद्ध 'या' प्लेइंग इलेव्हनसह उतरणार मैदानात

India vs Pakistan Playing XI : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना 9 जूनरोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेतील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जगभरातील करोडो क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत.टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तान संघावर वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकूण 7 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे.

यावेळी रोहितच्या सेनेचे लक्ष्य पाकिस्तानविरुद्ध सातवा विजय नोंदविण्यावर असेल. पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात 'भारताचे प्लेइंग इलेव्हन कोणते मैदान उत्तरवणार यावर एक नजर टाकूया....पाकिस्तान विरुद्ध कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी सलामीला येऊ शकते. तर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. ऋषभ पंत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाजी असो की विकेटकीपिंग, ऋषभ पंतची जादू मैदानावर पाहायला मिळते.

IND-PAK च्या ग्रुप A मध्ये उडाली खळबळ ! एका मॅचने बदलले समीकरण; पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर?

चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, टी-20 फॉरमॅटमध्ये सूर्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त आहे. आणि तो मैदानात 360 डिग्रीमध्ये कुठे पण चौकार आणि षटकार मारू शकतो. पाचव्या क्रमांकावर शिवम दुबे तर सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या असेल. यासोबत डावखुरा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो
यासोबत डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलची या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली जाईल. तर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल पुन्हा बाहेर बसावे लागु शकते. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांची पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली जाईल.

'ही' असू शकते पाकिस्तानविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पत

(यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग,



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply