USA vs PAK : युएसएने इतिहास रचला! मुंबईकर नेत्रावळकरची सुपर ओव्हरमध्ये सुपर बॉलिंग, पाकिस्तानचा पराभव

USA vs PAK T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या ग्रुप A मधील सामन्यात युएसएने पाकिस्तानविरुद्धचा सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्यांनी पाकिस्तानचे विजयासाठीचे 160 धावांचे पार करताना 20 षटकात 3 बाद 159 धावा केल्या. युएसएकडून कर्णधार मोनार्क पटेलने अर्धशतकी खेळी केली तर धडाकेबाज फलंदाज एरोन जॉन्सने नाबाद 36 धावा करत सामना टाय केला.

त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये युएसएने 18 धावा केल्या होत्या मात्र प्रत्युत्तरात पाकिस्तानला फक्त 13 धावाच करता आल्या. गोलंदाजीत सामन्यात दोन विकेट घेणाऱ्या सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये देखील प्रभावी मारा करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
अशी झाली सुपर ओव्हर

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या युएसएने 1 बाद 18 धावा केल्या. यातही जोन्सच्या 11 थावांचे मोठे योगदान होते. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पाकिस्तानला कधीकाळी मुंबईकडून खेळणाऱ्या सौरभ नेत्रावळकरने चांगलेच सतावले.

USA Vs PAK : युएसएने पाकिस्तानचा निम्मा संघ शंभरच्या आत गुंडाळला; आफ्रिदीनं पार करून दिला 150 धावांचा टप्पा

पहिला चेंडू - डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिला चेंडू निर्धाव टाकला.

दुसरा चेंडू - दुसऱ्या चेंडूवर इफ्तिकारने चौकार मारला. पुढचा चेंडू वाईड टाकला.

तिसरा चेंडू तिसऱ्या चेंडूवर नेत्रावळकरने इफ्तिकारला बाद केलं. युएसएला सामना जिंकण्यासाठी एक विकेटची गरज होती तर पाकिस्तानला 3 चेंडूत 14 धावांची गरज होती. नेत्रावळकरने पुन्हा एकदा वाईड टाकला.

चौथा चेंडू - चौथ्या चेंडूवर लेग बाईज 4 धावा झाल्या. पाकिस्तानला आता विजयासाठी 2 चेंडूत 9 धावांची गरज होती.

पाचवा चेड्डू - पाचव्या चेडूवर शादाबने दोन धावा केल्यामुळे आता शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी 7 धावांची गरज होती

सहावा चेडू - नेत्रावळकरने फक्त । धाव देत युएसएला ऐतिहासिक विजय मिळवून दिला

सामन्याबद्दल बोलायच झाल तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या युएसएने पाकिस्तानला 159 धावात रोखल, युएसएच्या नेत्रावळकर (4) पटकात 18 धावा देत 2 विकेट्स) आणि नोश्तुश किजिगेने (3) विकेटस) प्रभावी मारा करत पाकिस्तानची अवस्था 5 बाद 98 धावा अशी केली होती. मात्र बाबर आझमने 43 चेंडूत 44 थावाची संथ का असेना मात्र महत्वाची खेळी केली. त्यानंतर शादाब खानने 40 धावाचे योगदान दिले. शेवटच्या षटकात शाहीन आफ्रिदीने 23 धावा करत पाकिस्तानला 159 धावांपर्यंत पोहचवले.

पाकिस्तानचे 160 धावाचे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या युएसएने चांगली सुरुवात केली. कर्णधार मोनार्क पटेलने स्टीव्ह टेलरसोबत 36 धावांची सलामी दिली. त्यानंतर पाकिस्तानने कर्मबक करण्याचा प्रयत्न केला. मात्र आद्रेस आणि मोनार्कने दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागदारी रतच संघाला शतकी मजल मारून दिली.

मात्र मोनार्क अर्धशतक ठोकून बाद झाला. आदेस देखील 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र एरॉन जोन्स (26 चेंडूत नाबाद 36 धावा) आणि नितीश कुमार (14 चेंडूत नाबाद 14 धावा) यानी युएसएला सामना जिंकून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. या दोघानी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. अखेर शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज असताना नितीश पटेलने चौकार मारत सामना टाय केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply