Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

New Delhi : मुंबई इंडियन्सचा अनुभवी खेळाडू रोहित शर्मा याने रविवारी आयपीएल लढतींचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीवर (ब्रॉडकास्टर) संताप व्यक्त केला. आपली वाहिनी अधिकाधिक व्यक्तींनी बघितली जावी, यासाठी क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्यातील संवाद प्रसारित करणे योग्य नव्हे. क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा, अशा शब्दांत रोहित शर्मा याने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहित शर्मा याने पुढे नाराजी व्यक्त करताना म्हटले की, क्रिकेटपटू सराव किंवा सामन्यादरम्यान सहकारी, मित्र यांच्याशी संवाद साधत असल्याचा क्षणही कॅमेऱ्यात कैद केला जात आहे. माझा संवाद रेकॉर्डिंग करू नका, असे सांगण्यात आल्यानंतरही त्या संवादाचे प्रसारण करण्यात आले. गोपनीयतेचे हे उल्लंघन आहे. वाहिनीला फक्त वेगळे काही तरी दाखवायचे असते. त्यामुळे ती घटना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते असे त्यांना वाटते; पण यामुळे चाहते, क्रिकेटपटू व क्रिकेट यांच्यामधील विश्‍वासाला तडा जाईल.

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

अभिषेक नायर याच्यासोबत संवाद

मुंबई इंडियन्स - कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये ११ मे रोजी आयपीएल लढत पार पडली. या लढतीदरम्यान रोहित शर्मा व कोलकताचा सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यामध्ये संवाद झाला. दोघांमधील संवादाचा हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. यामध्ये रोहित अभिषेकला म्हणतोय की, ‘‘येथे एक एक बाब बदलत चालली आहे; पण जे काही आहे, ते माझे घर आहे. जे मंदिर आहे ते मी बनवले आहे.’’ रोहित ज्या वक्तव्यावरून तो मुंबई इंडियन्स संघासंबंधित बोलत आहे हे समजत आहे. या संवादाच्या अखेर तो सांगताना दिसत आहे की, ‘‘हा माझा अखेरचा मोसम असणार आहे.’’ त्याच्या या वक्तव्यावरून तो मुंबई इंडियन्ससाठी यापुढे खेळणार नाही, असे स्पष्ट होताना दिसत आहे.

धवल कुलकर्णीसोबतचा संवाद

अभिषेक नायरसोबतच्या संवादाचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आल्यानंतर रोहित शर्मा भडकला. त्यानंतर लखनौ सुपर जायंटस्‌विरुद्धच्या लढतीआधी रोहित शर्मा धवल कुलकर्णी याच्याशी संवाद साधत होता. त्यावेळी रोहित शर्माने हात जोडूने ब्रॉडकास्टर यांना ऑडिओ बंद करण्याची विनंती केली. त्यामध्ये तो बोलताना दिसत आहे की, ‘‘भाई ऑडियो बंद करो. एक व्हिडीओने मेरी वाट लगा दी.’’

 

पुढच्या आयपीएलमध्ये संघ बदलणार?

मुंबई इंडियन्सकडून यंदाच्या मोसमात रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. मुंबईच्या चाहत्यांना ते आवडले नाही. प्रत्येक लढतीदरम्यान तीव्र विरोध होताना दिसत होता. रोहित शर्मालाही हे आवडले नसावे. त्याच्याशी संवाद न साधता थेट निर्णय घेतला गेल्याची शक्यता आहे. यामुळे तो पुढल्या मोसमापासून संघ बदलणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. येत्या वर्षअखेरीस आयपीएलला मोठा लिलाव होणार आहे. बरीच वर्षे मुंबईशी जोडून राहिलेला रोहित पुढल्या मोसमात कोणत्या संघासोबत खेळतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र, याला अद्याप बराच अवधी आहे. तोपर्यंत संघ मालकांकडून रोहितची मनधरणी करण्यात आल्यास आश्‍चर्य वाटायला नको.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply