Chiplun Heavy Rain : भर उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; चिपळून, अडरे भागात नद्या झाल्या प्रवाहित

Chiplun Heavy Rain : राज्यभरात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. या दरम्यान मागील दोन ते तीन दिवस राज्यभरातील विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. कोकणातील देखील अनेक ठिकाणी चक्रीवादळ आणि पाऊस पडण्याचे प्रकार सुरू आहेत. यात आता चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचे समोर येत आहेत

राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन होत असल्याने प्रचंड नुकसान होत आहे. तर दुसरीकडे तापमान ४२ अंशाच्या वर पोहचले असून उन्हाची तीव्रता देखील जाणवत आहे. अशा परिस्थितीत कोकणातील चिपळूण परिसरात मे महिन्याच्या हिटमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. सुमारे अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे, अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या. 

Dharashiv Crime : कळंब शहरात दुकानावर दरोडा; १ लाख रुपये व सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी

मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेला मुसळधार पाउस चर्चेचा विषय बनला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहे. जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो, त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला. त्यामुळे इथल्या तुडुंब शेताचे आणि वाहणाऱ्या नद्यांचे व्हिडिओ जोरदार वायरल होत आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply