Sambhajinagar Crime : संतापजनक..मूल होत नसल्याने विवाहितेच्या अंगावर मारले खिळे; दोघांवर गुन्हा दाखल

Sambhajinagar Crime : मूलबाळ होत नसल्यामुळे महिलेचा अमानुष छळ करण्यात आला आहे. इतकेच नाही तर विवाहितेच्या अंगावर खिळे मारल्याचा धक्कादायक प्रकार  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नानंतर  मुलबाळ होत नसल्याने विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचे अनेक प्रकार ऐकण्यास मिळतात. मात्र संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे शारीरिक छळ करताना थेट विवाहितेच्या अंगावर खिळे मारून अमानुष छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Ajit Pawar : आचारसंहिता भंग झाला नाही! त्या वक्तव्यावर अजित पवारांना मोठा दिलासा

आत्मा असल्याचे सांगत मारहाण 

तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा आहे. त्यामुळे मुलबाळ होत नसून, तो आत्मा बाहेर काढण्याचा बहाणा करून एका विवाहितेला काठीने मारहाण करीत अंगावर खिळे मारून तिचा अमानुष छळ केला गेला. गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे हा प्रकार घडला असून, याप्रकरणी आबिदा मुक्तार शेख आणि हकीम मुक्तार शेख यांच्यावर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply