PM Modi : आरबीआयला 90 वर्ष पूर्ण, मोदींच्या हस्ते 90 रुपयांच्या नाण्याचं अनावरण; एक नाणं खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

PM Modi : रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांच्या नाण्याचं आज अनावरण केलं आहे. या नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते 40 ग्रॅम शुद्ध चांदीपासून बनवण्यात आलं आहे. एक नाणं खरेदी करण्यासाठी अंदाजे 5200 ते 5500 रुपये खर्च करावे लागणार आहेत.  

रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचं नाणं जारी केलं आहे. देशात प्रथमच 90 रुपयांचं नाणे जारी करण्यात आलं आहे. या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचं आहे. याशिवाय यामध्ये 40 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आलाय. 90 रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे. दुसऱ्या बाजूला 90 रुपये असा मजकूर लिहिलेला आहे.

Pimpri Chinchwad : उद्यानातील १ हजार झाडे वाचविण्यासाठी अनोखा निर्णय; पिंपरी चिंचवडमधील शेकडो नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

नाण्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेलं आहे. त्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो आणि वरच्या बाजूला हिंदीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि खालच्या बाजूवर इंग्रजीमध्ये लिहिलेलं  आहे. लोगोच्या खाली RBI @90 असं लिहिलेलं आहे.

भारत सरकारच्या टांकसाळीत बनवलेल्या या 90 रुपयांच्या नाण्याचे वजन 40 ग्रॅम असेल. हे नाणे 99.9 टक्के शुद्ध चांदीपासून बनवलेले आहे. याआधीही 1985 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण जयंती आणि 2010 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्लॅटिनम ज्युबलीवर नाणी जारी करण्यात आली आहेत.

नव्वद रुपयांचं हे नाणे लाँच केल्यानंतर त्याची दर्शनी मूल्यापेक्षा अधिक प्रीमियमवर विक्री केली जाणार आहे. या नाण्याची किंमत किंमत 5200 ते 5500 रुपये असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसह नाणे संग्राहकांमध्ये या नाण्याबाबत प्रचंड उत्साह दिसून येत आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने 19 मार्च 2024 रोजी हे नाणे जारी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना जारी केली होती.

आरबीआयच्या 90 वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आरबीआयची भूमिका खूप महत्त्वाची आणि मोठी आहे. आरबीआयच्या कामाचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक समावेशनाचे फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply