Nagpur News : विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, तीन युवकांना 20 वर्षे सश्रम कारावास

Nagpur News :  अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या तिघांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने विशेष न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार इम्रान शेख रहेमान शेख (वय १९), चिंटू रमेश पाटील (वय २५) आणि दिनेश पवार (वय २१) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार नागपूर येथील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 डिसेंबर 2016 रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास पीडिता तिचा संगणकाचा क्लास संपून घरी परत जात होती. यावेळी तिच्यासोबत ४ वर्गमित्रही होते. रात्रीच्या संधीचा फायदा घेत आरोपींनी त्यांना अडविले. त्यानंतर तिच्या मित्रांना मारहाण केली.

Devendra Fadnavis : अजित पवारांनी मागितलं तरी ते खातं देणार नाही! देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

मुलीला लगतच्या परिसरात नेऊन तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. एकेदिवशी तिने हा सगळा प्रकार शाळेतील एका शिक्षिकेला सांगितला.

शिक्षिकेने तिला धीर देत तिच्या पालकांना बाेलावून सगळा प्रकार सांगितला. पिडितेसमवेत पालकांनी पाेलिसांत धाव घेत घडलेल्या सगळ्या प्रकाराची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी तिघांवर गुन्हा नाेंदवित त्यांच्यावर कारवाई केली.

या खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी तिन्ही नराधमांना 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच प्रत्येकी सात हजार रुपयांचा दंड ठोठावला. पीडितेच्या पुनर्वसनासाठी आवश्यक मदत करावी असे निर्देशही न्यायालयाने दिलेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply