Nanded Hospital News : नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच, रुग्णालयात आणखी ७ रुग्ण दगावले; मृतांचा आकडा ३१ वर

Nanded Hospital News : नांदेड शासकीय रुग्णालयातील २४ रुग्णांच्या मृ्त्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावरुन राज्य सरकारवर सडकून टीका होत असून राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार (२, ऑक्टोंबर) ला नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १२ नवजात बालकांसह २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

रुग्णालयात औषधांचा तुटवडा आणि वेळेत उपचार न मिळाल्याने हे रुग्ण दगावल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे मृत्यूचे सत्र अद्याप सुरू असून रुग्णालयात आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Kopar Building Collapse : कोपरमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला; परिसरातील नागरिकांमध्ये घबराट

अशोक चव्हाण यांचे ट्वीट...

"नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी... असे ट्वीट अशोक चव्हाण यांनी केले आहे.

राज ठाकरेंचा संताप...

दरम्यान, शासकीय रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला आहे. "तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply