Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाला शरद पवारांचा विरोध; सांगितला नवा तोडगा

जळगाव : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पण यावेळी हे आरक्षण ओबीसींच्या कोट्यातून देण्यात यावं अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. मनोज जरांगे यांनी यासाठी जालन्यात उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.

सरकारचीही त्यांच्याशी बोलणी सुरु आहे. अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. पण शरद पवारांनी यावर तोडगा सांगितला आहे, तसेच मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षणाला त्यांनी विरोध केला आहे.

शरद पवार म्हणाले, "ओबीसींचा आज जो कोटा आहे, त्यात वाटेकरी करणं हे सुद्धा एक प्रकारे ओबीसींमधील गरीबांवर अन्याय करण्यासारखं आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे. हे एकदम दुर्लक्ष करण्यासारखं नाही.

Wai Satara Maratha Morcha : सकल मराठा समाज वाई - सातारा पायी माेर्चा, आंदाेलकांना पाचवडनजीक पाेलिसांनी राेखले; प्रशासन-समन्वयकांची चर्चा सुरु

याला पर्याय हा आहे की, आज जी आरक्षणाची ५० टक्क्यांची अट आहे. त्या ५० टक्क्यांमध्ये आणखी १५ ते १६ टक्के वाढ करण्यासाठी दुरुस्ती संसदेत केंद्र सरकारनं करुन घेतली तर हे प्रश्न सुटू शकतात.

तसेच ओबीसी आणि इतरांमध्ये मतभेद नकोत जर त्यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आमचा त्याला यत्किंचितही पाठिंबा नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply