INDIA Mumbai Meeting : मुंबईतील बैठकीनंतर 'इंडिया'ची दिशा ठरणार? देशाला ५ प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता

इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या महत्त्वाच्या बैठकीत अनेक मुद्दे चर्चिले जाऊ शकतात. यामध्ये इंडिया आघाडीचे संयोजक कोण असतील, लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल, पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन, काही महत्त्वाच्या घोषणा देखील होऊ शकतात. 

लोकसभेचं जागावाटप कसं असेल?

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इंडिया आघाडीची स्थापना झाली आहे. मात्र आघाडीमध्ये पक्षांचा संख्या मोठी असल्याने जागावाटप कसं असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकतो. जागावाटपाचा राज्यनिहाय विचार करुन फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो. जागावाटपासाठी एखाद्या समितीची स्थापना करुन त्या समितीवर ही जबाबदारी सोपवली जाऊ शकतो.

'इंडिया'चे संयोजक कोण?

इंडिया आघाडीचे  संयोजक म्हणून काही प्रमुख नेत्यांचा नावे चर्चेत आहे. यामध्ये नितीशकुमार यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र आघाडीतील काही नेत्यांना त्यांच्या नावाला विरोध केल्याचीही माहिती समोर येत आहे. या व्यतिरिक्त ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे यांची नावंही चर्चेत आहे. संजोजकाकडे सर्व पक्षांची समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे शरद पवारांचं नावही समोर येत आहे. शरद पवारांनी ही जबाबदारी स्वीकारावी अशीही मागणी होत असल्याचीही चर्चा आहे.

Mumbai Crime : मृतदेहाचे ४ Mumbai Crime Newsतुकडे केले, पत्नीची छेड काढत असल्याचा आरोपीला संशय

'इंडिया'चे संयोजक कोण?

इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून काही प्रमुख नेत्यांचा नावे चर्चेत आहे. यामध्ये नितीशकुमार यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र आघाडीतील काही नेत्यांना त्यांच्या नावाला विरोध केल्याचीही माहिती समोर येत आहे. या व्यतिरिक्त ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे यांची नावंही चर्चेत आहे. संजोजकाकडे सर्व पक्षांची समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे शरद पवारांचं नावही समोर येत आहे. शरद पवारांनी ही जबाबदारी स्वीकारावी अशीही मागणी होत असल्याचीही चर्चा आहे.

थीम साँग आणि लोगो

इंडिया महाआघाडीचे नवे थीम साँग आणि लोगो आज रिलीज केला जाऊ शकतो. इंडिया आघाडीचे थीम सॉंग अनेक भाषांमध्ये असू शकतं. तसेच इंडिया आघाडीच्या लोगोचंही आज अनावर होण्याची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply