Delhi Smuggling Case : दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; १० कोटी रुपयांच्या विदेशी चलनाच्या नोटा जप्त

Delhi News: दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाने विदेशी चलनाच्या नोटा जप्त केल्या आहेत. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताजिकीस्तानातील ३ नागरिकांची झडती घेतली, त्यावेळी त्यांच्याकडे ७,२०००० डॉलर आणि 4,66,200 युरो आढळले. या नोटांची एकूण किंमत १० कोटी रुपये आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी इस्तंबुलच्या विमानात बसणार होते. त्यावेळी या आरोपींना अटक करण्यात आली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

या तीन आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही सामावेश आहे. या आरोपींनी बुटामध्ये नोटा लपवल्या होत्या. भारतामध्ये विदेशी नोटांचा इतका साठा कधीही सापडला नव्हता.

८ कोटी रुपयांचे सोन जप्त

१३ जून रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोन्याची सर्वात मोठी कारवाई केली आहे . या विमानतळावर १६.५७० किलो किंमतीचे सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ८.१६ कोटी रुपये आहे. या प्रकरणी आजी-नातीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील एका आरोपीला सहज पकडण्यात यश आलं. परंतु दुसऱ्या आरोपीला पकडण्यास मेहनत घ्यावी लागली. कारण या आरोपीने विमानतळावर येताच कपडे बदलेले होते. या आरोपीला ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर अटक करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान, आरोपीकडून बॅग आणि कपड्यातून २६५ सोन्याची चैन आणि ९ ब्रेसलेट आढळून आले. या सोन्याचं वजन १६.५७० किलो इतकं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply