Yavatmal Flood News : पैनगंगा नदीने धारण केलं रौद्ररूप, पुराच्या पाण्यात ४० जण अडकले; पावसामुळे बचावकार्यात अडथळा

Yavatmal Rain Update: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अनेक शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. इर्शाळवाडीची घटना ताजी असतानाच आता यवतमाळमधून एक चिंताजनक बातमी समोर आलीये. पावसाचा जोर वाढल्याने ४० जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. 

पाण्यात अडकले चाळीस जण

मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पुर आला आहे. या पुराचा फटका अनेक गावांना बसला आहे. पुराने परिसरात वेढा घातल्याने अनेक जण पाण्यात अडकलेत. आनंद नगर येथील नागरिक पुराच्या पण्यात अडकले आहेत. त्यांचे बचावकार्य सुरू आहे.

नदीचे पाणी आनंद नदरमध्ये शिरल्याने संपूर्ण परिसराला नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. दूरदूरवर नजर फिरवल्यास रस्त्यावर कंबरेच्यावर पाणी साचल्याचं दिसत आहे. आलेल्या पुरामुळे अनेकांची घरे वाहून गेली आहेत. बचाव पथक पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने बचाव पथकांना नाईलाज झालाय.

महागाव तालुक्यातील हिवरा संगम गट ग्रामपंचायतमधील आनंद नगर येथे पाणी वाढत चालल्याने काही नागरिक बोटीवर बसलेत. या ४० जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.

Eknath Shinde : इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त मुलांना मोठी मदत, मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार पालकत्व

ॲारेंज अलर्ट जारी

मुंबईत आज ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार सुरूच आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावलीये. त्यामुळे आजही मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन मुंबईकरांनी घरातून बाहेर पडावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply