Mumbai Flood Update : पावसाचा कहर! बदलापूर येथे २०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले

Maharashtra Monsoon Update : राज्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून कोकणात रायगड, रत्नागिरीसह मुंबई शहर आणि परिसरात देखील मुसळधार पाउस कोसळत आहे. या दरम्यान जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दरम्यान अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

यादरम्यान अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर येथे सोनिवली व हेंद्रेपाडा येथील सुमारे २०० कुटुंबांना बदलापूर येथील बीएसयूपी इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. सोनिवली येथील यादव नगर भागातील लोकांना म्हाडा कॉलनी सोनिवली या ठिकाणी शिफ्ट करण्यात येत असून शिफ्टिंगचे काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यात देखील मोरया नगर, कांबा येथील तब्बल ६० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान मोरोवली गाव परिसरातील नाल्याचे पाणी रेल्वे रुळावर आल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती. तसेच पावसाच्या पार्श्वभूमिवर अंबरनाथ येथील सहवास वृद्धाश्रम मधील नागरिकांना देखील स्थलांतरित करण्यात आले आहे.

Weather Update: आज राज्यात मुसळधार, पुण्यासह 'या' 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट

अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं. त्यामुळं प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंग पाण्यात बुडालं. अंबरनाथमध्ये तब्बल ९६२ वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराला लागूनच वालधुनी नदी वाहते. प्राचीन शिवमंदिरातून पिंडीवरील पाणी बाहेर जाण्यासाठी एक आऊटलेट थेट वालधुनी नदीत सोडण्यात आलंय. गेल्या २ दिवसांपासून अंबरनाथ शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

रायते ते दहागाव मार्गावरील उल्हास नदीवरील पुलावर पाणी गेले आहे. तसेट मुरबाड तालुक्यातील चिखले गावाजवळून जाणाऱ्या काळू नदीवरील पुलावरून पाणी गेले आहे. मुरबाड येथिल मुरबाडी नदीवरील पुलावरूनही पाणी जात आहे. या प्रत्येक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन व महसूल यंत्रणा कार्यरत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply