10th Board Exam : पेपर अवघड गेल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, गडहिंग्लजमधील धक्कादायक घटना

10th Board Exam : राज्यात दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. अनेक विद्यार्थी पेपर सोपे गेल्यामुळे खुश आहेत, तर अनेक विद्यार्थी थोडेसे तणावात देखील आहेत. याच तणावातून अनेकदा विद्यार्थी नैराश्यात जातात. बऱ्याचदा ते टोकाचं पाऊल उचलतात, अशीच एक घटना कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधून समोर आली आहे. 

दहावीचे आतापर्यंत झालेले पेपर अवघड गेल्यामुळे १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. गडहिंग्लजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम लक्ष्मण कोळी  (वय १६, रा. स्वामी कॉलनी, गडहिंग्लज, मूळ गाव हेब्बाळ), असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. या विद्यार्थ्याने घरामध्ये फॅनला गळफास घेऊन जीवन संपवल्याचं समोर आली आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या विरोधात विरोधी पक्षही ; मनोज जरांगे यांचा आरोप

सत्यमचे वडील खासगी नोकरी करतात. लक्ष्मण कोळी यांचा सत्यम हा गडहिंग्लजमध्ये एका खासगी शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. मार्च महिन्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर त्याला पेपर अवघड जात होते. असं तो त्याच्या घरच्यांना सांगतही होता. याच तणावातून त्याने सोमवारी (१८ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास त्याच्या बेडरूममध्ये फॅनला गळफास  घेतला.

सत्यमने आत्महत्या केल्याचं निदर्शनास येताच घरच्यांनी तातडीने त्याला दवाखान्यात दाखल केलं. परंतु दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच सत्यमचा मृत्यू झाला होता. गडहिंग्लजमध्ये ही धक्कादायक घटना घडली  आहे. दहावीचे पेपर अवघड गेल्यामुळे सत्यमने जीवन संपवले आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply