10th Board : तिघांना अटक! झेरॉक्स केंद्रात उत्तरपत्रिका पोहोचली कशी?


10th Board : राज्यात कॉपीमुक्त अभियान सुरू असताना दहावी बोर्डाच्या पहिल्याच मराठीच्या पेपरला ग्रहण लागलंय. जालना आणि यवतमाळमध्ये २१ फेब्रुवारीला पेपर फुटला होता. दहावीचा पेपर नेमका कुणी फोडला, हा प्रश्न उपस्थित झाला होता. यानंतर पोलिसांकडूनही शोध सुरू होता. अशातच या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आलंय.यात मल्टी सर्विसेस चालकासह एका अज्ञात आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. बॉर्डाच्या दहावीच्या पहिल्याच परिक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. जालना आणि यवतमाळमध्ये मराठीचा पेपर फुटला होता. जालन्याच्या बदनापूरमध्ये अवघ्या १५ मिनीटात दहावीचा पेपर फुटला आणि सोशल मीडियात वाऱ्यासारखा पसरला.

Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

बदनापूर पेपर फुटीप्रकरणी मल्टी सर्विसेस चालकासह एका अज्ञात आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सी.एस.सी केंद्र चालकासह एका इंग्रजी माध्यमातील शाळेच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र झेरॉक्स केंद्रचालकांना उत्तर पत्रिका तयार करून देणारी व्यक्ती कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या उत्तर पत्रिकांमध्ये प्रश्न क्रमांकासह काही प्रश्नांची उत्तरे टाईप केली आहेत. काही प्रश्नांची उत्तरे हस्तक्षरात आहेत .त्यामुळे उत्तर पत्रिका तयार करणारा हा व्यक्ती कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रश्नपत्रिका फुटलीच नाही, असा दावा त्यांनी केला आहे. प्रश्न पत्रिका केंद्राच्या बाहेर आलेली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच दोषी व्यक्तीवर कारवाई होईल, असंही जिल्हाधिकारी म्हणालेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply