⁠Manoj Jarange Patil : 'मी बारावी पास...'; छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं रोखठोक उत्तर, म्हणाले...

Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. आज मनोज जरांगे पुण्यात पोहोचले आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 'आता आणखी एक महादिवाळी होणार, असं म्हणत कायदेशीर कुणबी प्रमाणपत्र मिळणार अशी शक्यता मनोज जरांगेंनी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांच्या टीकेलाही रोखठोक उत्तर दिलं आहे. 

मनोज जरांगे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'गेल्या ७०-७५ वर्षातील मराठा समाजासाठीचा सर्वात मोठा कायदा झाला आहे. आता आणखी एक महादिवाळी होणार आहे. कायद्याच्या आधारे पहिले प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एक मोठी जंगी सभा होणार आहे'.

Bribe Trap : सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात; बारा हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

 'प्रामाणिक आंदेलन आणि नेतृत्व कराण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ⁠२०-२२ वर्षापासून समाजाचे काम करत आहे. ⁠येवल्याच्या माणसाने महटले, मी पाचवी शिकलो आहे. पण मी १२ शिकलो आहे. मी किती शिकलो हे शोधण्यात सरकारने तीन-चार दिवस घालवले आहे. ⁠आरक्षणावर तत्काळ उपाय शाधण्याचा प्रयत्न केला आहे. ⁠आधी गोदा पट्ट्यातील १२३ गावे एकत्र केले, असे जरांगे पाटील म्हणाले.

'लाठीहल्ल्याला आम्ही टर्निंग पॉइंट म्हणू शकत नाही. आमच्या आया-बहिणींना मारहाण झाली. ⁠आम्हाला धिंगाणा करायचा असता तर, पहिल्याच दिवशी केला असता. ⁠लाठीहल्ला होण्यासाठी तीन दिवस वाट का पाहिली असती? ⁠एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी माझे कौतुक केले, असेही त्यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply