“९० टक्के बांधकामं बेकायदेशीर आहेत, अगदी…’; नारायण राणेंचा आरोप

वेगवेगळ्या विषयांवर राज्यातील राजकारण तापलेलं असताना मुंबई महापालिका केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घरावर हातोडा चालवण्याची शक्याता वाढली आहे. आज राणे यांचा घराच्या नियमिततेचा अर्ज पालिकेकडून नामंजूर करण्यात आला आहे. तसेच राणे यांना त्यांच्या घराची कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रिय मंत्री नारायण राणे, पालिकेच्या या कारवाईबद्दल बोलताना म्हणाले खी महापालिकेने पाठवलेली नोटीस सुडातून पाठवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात जेवढी बांधकाम आहेत, त्यातील नव्वद टक्के बांधकामं बेकायदेशीर आहेत, अगदी मातोश्रीच्या जवळ बेहरामपाडा आहे, येथे तीन-तीन माळे आहेत, सगळे बेकायदेशीर आहेत. पण सरकारला पाहायचं धाडस नाही, असा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, पण माझ्या घरावर अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर प्रवेश केला आहे. तरी यांनी नोटीसा दिल्या. त्याला मी त्याला उत्तर देतो, हे राजकारण आहे, कायदेशीर कारवाई नाही.कमिशनरांना फक्त माझं घर दिसतंय बाकी ठिकाणी फिरताना ते डोळे बांधून फिरतात मुख्यमंत्रीही तसेच, असे नारायण राणे यांनी सुनावलं.

मला नोटीस देणाऱ्यांनी आपली घरं पाहावीत मी देखील नोटीसी द्यायला लावू शकतो, पण कोणाच्या घरावर, भावनिक राजकारण आणायचं नाही, असे देखील त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply