हडपसर येथील उड्डाणपुलची दुसरी लेनही लवकरच सुरू

हडपसर : हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपूल एका बाजुने सुरू करण्यात आल्यानंतर सोलापूरकडे जाणारी हलकी वाहने पुलावरून जात आहेत. पुण्याकडे जाणारी लेन सुरू करण्याकरीता वेगाने काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आमदार चेतन तुपे यांनी दिल्या आहे. त्यानुसार पुणे बाजुकडील लेन लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, कार्यकारी अभियंता इंद्रभान रणदिवे यांनी सांगितले.

हडपसर उड्डाणपुलाच्या बेअरिंग्ज झिजल्याने वाहनांना हदरे बसत होते, त्या एका बाजुच्या दुरुस्त करण्यात आल्याने एक लेन सुरू करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या एका खांबाच्या बेअरिंग्ज दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून काही दिवसांत दुसरी लेनही सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, हडपसर उड्डाणपुलाच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांची हडपसर क्षेत्रीय कार्यालयात आमदार तुपे यांनी गेल्या महिन्यांत तातडीची बैठक घेत पुलाची दुरुस्ती बाबत सूचना केल्या होत्या. तत्पूर्वी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही आमदार तुपे यांनी सांगितले होते. या बैठकीत वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, परिमंडळ - ५च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पालिकेच्या अधिक्षक अभियंता सुष्मिता शिर्के, कार्यकारी अभियंता इंद्रभान रणदिवे यांच्यासह नगरसेवक मारुती आबा तुपे, योगेश ससाणे, संजय घुले, नगरसेविका वैशाली बनकर, नगरसेविका हेमलता मगर, माजी नगरसेवक सुनिल बनकर यांनीही चर्चेत ये सहभाग घेत सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत म्हणणे मांडले होते. या प्रयत्नातून उड्डाणपुलाची एक ये लेन सुरू करण्यात यश आले असून दुसरी लेन सुरू करण्याचे कामही अंतिम टप्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply