हडपसर उड्डाणपुलावर वीस दिवसांतील तिसरा प्रकार

हडपसर उड्डाणपुलावरील हलके वाहने जाण्यासाठी लोखंडी कमान उभारण्यात आली होती, मात्र तीन आठवड्यांतच कमानीला अनेक वाहने धडकून पुन्हा कमान कोसळली आहे.

गेल्या वीस दिवसांत तीन वेळा असा प्रकार घडला आहे. त्यातून पालिकेचे निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा एकदा दिसून येते. हडपसर उड्डाणपूलवरून सहा दिवसांपासून हलकी वाहने येथील सोलापूर रोड व सासवड रोडकडे सोडण्यात आली आहेत. त्यामुळे नियमित जाणारी वाहने हाईट अॅरिकेडची उंची गृहित धरून वाहने जात होती. बुधवारी सकाळी कमान कोसळल्याची घटना घडली, त्यात कोणालाही दुखापत मात्र झाली नाही. पालिकेने अचानक हाईट बॅरिकेड एक फुटाने खाली घेतल्याने वाहने धडकून अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. महापालिकेने रात्री अचानक बॉरकेडची उंची कमी केली. त्यानंतर त्याठिकाणी कोणतेही सूचनाफलक लावले नाही. कमी उंची केल्याचा फलक लावला नसल्याने उंची गृहित धरून वाहने पुलावरून जातात आणि धडकतात. महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे वाहने धडकल्याचे प्रमाण वाढतच आहे. उाणपुलाच्या सुरुवातीला सोलापूर रोडकडे जाण्यासाठी १० फूट उंच हाईट बोरकेड लावून हलक्या वाहनांसाठी मार्ग खुला केला होता. त्यानंतर रात्री बॅरिकेडची एक फूट उंची कमी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply