स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : “सोशल मीडियावरील खात्यांचे डीपी बदलवून राष्ट्रध्वजाचा फोटो ठेवा”; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

देश स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपल्या सोशल मीडियावरील खात्यांचे डीपी बदलवून राष्ट्रध्वजाचा फोटो ठेवावा, असे आवाहन त्यांनी ट्वीटद्वारे केले आहे.

”आज विशेष २ ऑगस्ट आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशात हर घर तिरंगा ही विशेष मोहीम सुरू आहे. मी माझ्या सोशल मीडियावरील डीपी बदलला आहे. तसा तुम्हीदेखील बदलवावा”, असे आवाहन त्यांनी ट्वीटद्वारे केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रध्वजाची रचना करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. ”पिंगली व्यंकय्या यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. देशाला राष्ट्र्ध्वज दिल्याबद्दल राष्ट्र त्यांचे सदैव ऋणी राहिल. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. राष्ट्रध्वजापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी काम करत राहू”, असेही ते म्हणाले.

पंचतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भापजाच्या अनेक नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यांचे डीपी बदलावून राष्ट्रध्वाजाचा फोटो लावला आहे.

रविवारी (३१ जुलै ) रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमातही त्यांनी नागरिकांना २ ते १५ ऑगस्ट दरम्यान सोशल मीडियावर राष्ट्रध्वजाचा डीपी ठेवावा, असे आवाहन केले होते. आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना एका गौरवशाली आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार असल्याचेही ते म्हणाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply