“स्वराज्याचा अर्थ फक्त शासन बदलणे नाही, तर आपल्या धर्मानुसार सरकार चालणे”; अमित शाह यांचे प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही तर विचार आहे. शिवाजी महाराज यांनी सुरू केलेला स्वराज्य संघर्ष अजूनही सुरू आहे. स्वराज्याचा अर्थ फक्त शासन बदलणे नाही तर आपल्या धर्मानुसार सरकार चालणे असा आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केले. मंदिर पुनर्निर्मितीचे काम शिवाजी महाराजांनी केले होते. या प्रकारचे काम आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. राममंदिर, काशी विश्वनाथ, सोमनाथ मंदिर ही त्याची उदाहरणे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे नऱ्हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाअंतर्गत सरकारवाड्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेेळी ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रसाद लोढा, आमदार, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाहक प्रवीण दबडघाव, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर यावेळी उपस्थित होते.

स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा हा शिवाजी महाराजांचा विचार नव्या पिढीपर्यंत पोचविण्याचे काम या शिवसृष्टीद्वारे होईल. ही शिवसृष्टी आशियातील सर्वात मोठा ‘थीम पार्क’ ठरणार आहे. शिवसृष्टीचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

शाह म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवले. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज यांचा विचार देशभर पोहोचवला. ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या माध्यमातून त्यांनी मोठ कार्य केले. शिवाजी महाराज यांच्या विचारासाठी पुरंदरे यांनी जगभरातून संदर्भ जमा केले. शिवरायांसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी शिवरायांचा विचार सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवला. पुरंदरे यांनी हे काम केले नसते, तर शिवाजी महाराज यांची ओळख मोठ्या प्रमाणात देशभर पोहोचली नसती, पुरंदरे यांचे स्वप्न आज सत्यात उतरत आहे, याचा आनंद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या कामासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply